पुणे

करंजविहिरे येथे विकासकामांचे भूमीपूजन

CD

आंबेठाण,ता. १५: गावांच्या राजकीय संघर्षात लक्ष न देता सर्वांना विकासाच्या प्रक्रियेत बरोबर घेतल्यामुळे आपण ग्रामीण विकासातील अग्रेसर गावे निर्माण करू शकलो, असे मत जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी करंजविहिरे (ता.खेड) येथे व्यक्त केले. 
जिल्हा परिषद निधीतून होत असलेल्या पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र निवासस्थान इमारत व परिसर सुधारणा, सभामंडप भूमिपूजन, ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
   यावेळी पंचायत समितीचे सदस्य चांगदेव शिवेकर यांनी शरद बुट्टे पाटील यांनी विकासाची दिशा दिल्याने चांगले काम करू शकल्याचे सांगितले. यावेळी आंबेठाणचे माजी सरपंच दत्तात्रेय मांडेकर, देविदास बांदल यांचीही भाषणे झाली. यावेळी सरपंच सुदाम कोळेकर, गणपत कोळेकर, शांताराम कोळेकर, सयाजी कोळेकर, अर्चना बोऱ्हाडे, बाळासाहेब शिवेकर, सतीश कोळेकर, सविता शिवेकर, अनिता कोळेकर, सारिका भोसले, बाळासाहेब मरगज, पोलिस पाटील सचिन मरगज, रामदास कोळेकर, श्रीपती कोळेकर, रामदास शिंदे, रमेश कोळेकर आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT