पुणे

सिद्धबेटची संरक्षक भिंत समाजकंटकांनी पाडली

CD

आळंदी,ता. ३ : येथील सिद्धबेटच्या संरक्षक भिंतीला यापूर्वी रस्ता वापरासाठी समाजकंटकांनी पाडलेली भगदाडे पालिकेने नुकतेच नव्याने बांधकाम करून बुजवली. मात्र, दुरुस्त केलेली भिंत काही समाजकंटकांनी पुन्हा पाडली.
आळंदी (ता. खेड) येथील संत ज्ञानदेव आणि भावंडांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सिद्धबेट येथील जागेचे सुशोभीकरणाचे काम स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मागील आठवड्यापासून सुरु आहे. यामध्ये प्रवेशद्वार, संरक्षक भिंती, रंगरंगोटी व सुशोभीकरणाचे काम चालू असून, इतरही विकासकामे नगरपरिषदेच्या पुढाकारातून चालू आहे. ऐतिहासिक वारसा भाविकांना पाहता यावा, यासाठी पालिकेने पुढाकर घेत कामे सुरु केली. मात्र, यापूर्वी देखभालीअभावी नदीकडे येजा करण्यासाठी संरक्षक भिंतींना ठिकठिकाणी पाडलेली मोठी भगदाड दुरुस्तीची गरज होती. अनावश्यक लोक या ठिकाणच्या भगदाडातुन ये-जा करत. एवढेच नाही तर या पवित्रभुमीत कचरा टाकणे, कचरा पेटवणे, वृक्षतोड करणे, अवेळी येऊन मद्य पिणे, असे विविध गैरवापर करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. या भगदाडे पाडलेल्या ठिकाणाहून अशा लोकांना मज्जाव करण्यासाठी भिंत पुन्हा बांधण्यात आली.
येथील पर्णकुटीजवळील काही अंतरावरील संरक्षक भिंतीचे एक भगदाड सिमेंट काँक्रिट वीट बांधकामाने आठवड्यापूर्वीच बुजविण्यात आले होते. ते पुन्हा समाजकंटकांनी पाडले.

काही उपद्रवी लोक स्वतःच्या फायद्यासाठी सिद्धबेटमध्ये गैरप्रकार करत आहेत. माउलींचा वारसा जतन करण्यासाठी पालिका पुढाकार घेत सुशोभीकरण करत आहे. यासाठी लाखो रुपये खर्च होऊन चांगले पर्यटन आणि आध्यात्मिक स्थळ होणार आहे. या संपूर्ण जागेवर शासनाची मालकी असून तशी महसुल दप्तरी नोंदही आहे. यामुळे भविष्यात कुणी गैरप्रकार केला, तर रीतसर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

SCROLL FOR NEXT