पुणे

अहंकार, मी पणाचा त्याग करावा

CD

आळंदी, ता. ९ : ‘‘ईश्वर चरणी लीन होताना अहंकार आणि मी पणाचा त्याग करावा. भक्तीच्या वाटेवर चालताना वारकऱ्यांनी अहंकाराचा वारा न लागो अंगी याचे अंगीकरण केल्यास ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद लाभतो.’’ असे विचार संत गोरोबाकाका संस्थानचे वाङमय प्रचारक दीपक खरात यांनी व्यक्त केले.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित कार्यक्रमात खरात बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते.
या वेळ दीपक खरात म्हणाले, ‘‘अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्तीमध्ये अहंकार असतो. कुणाला कर्तृत्वाचा, रुपाचा, ज्ञानाचा तर कुणाला पदाचा आणि सत्तेचा अहंकार असतो. अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. त्यामुळे भक्तीत लीन होताना ईश्वराऐवजी स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित असते. माऊलींनी सांगितल्याप्रमाणे वारकऱ्यांनी नम्रता अंगी बाणावी. सर्वांचा आदर सन्मान करावा. तेव्हाच आशीर्वाद प्राप्त होतो.’’
त्यानंतर भागवताचार्य बालयोगी हरिहर दिवेगांवकर यांचे कीर्तन झाले. तसेच विश्वशांती संगीत कला अकादमी, येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा विश्वशांती दर्शन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला.
या वेळी वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत स्वयंसेवा करणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवकांचा सत्कार केला. नंतर इंद्रायणी नदीची आरती झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT