पुणे

अष्टविनायक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

CD

पारगाव, ता. ३१ : येथील (ता.आंबेगाव) परिसरातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गाच्या लगत असलेल्या गटाराचे काम गेली अनेक महिने अर्धवट आहे रविवारी (ता.२९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास समोरून आलेल्या वाहनाच्या लाइटमुळे मोटारसायकलस्वार रस्त्यालगत असलेल्या उघड्या गटारात कोसळल्याने मोटारसायकल वरील कैलास कारभारी कापडी (वय ४७, रा. जारकरवाडी ) हे गंभीर जखमी झाले आहे.हा अपघात गटाराच्या अपूर्ण कामामुळेच झाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अष्टविनायक महामार्ग अंतर्गत रांजणगाव ते ओझर हा रस्ता पारगाव परिसरातून जात आहे या रस्त्याचे काम गेली वर्षभरापासून संथगतीने सुरु आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटार लाईन काम अर्धवट असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत एक महिन्यापूर्वीच दैनिक सकाळ मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती काम पूर्ण करण्याबाबत नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही संबंधित ठेकेदार अपूर्ण काम पूर्ण करत नाही त्यातच काल रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कैलास कारभारी कापडी मोटारसायकलवरून रस्त्यावरून येत असताना समोरून आलेल्या वाहनाच्या लाइटमुळे कापडी यांना रस्त्यालगत असलेला उघड्या गटारीच्या खड्याचा अंदाज न आल्याने ते मोटारसायकलसह त्या गटारीच्या खड्यात कोसळले. गटारीला असलेल्या उघड्या लोखंडी गजामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या. येथील व्यावसायिक संदीप निकम, बंटी देवडे, निखिल शेलोत व रमेश वारीक यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन कैलास कापडी यांना गटारीच्या खड्यातून बाहेर काढून येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी
अपघात केवळ गटारीच्या अपूर्ण कामामुळेच झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने जखमीच्या उपचाराचा खर्च करावा, अशी मागणी जखमीचे भाऊ एकनाथ कापडी यांनी केली आहे.
येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे आणखीन गंभीर दुर्घटना घडू नये म्हणून गटारांचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी केली आहे.
....................
01984

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT