पुणे

रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ राहणार

CD

बारामती, ता. ४ : बाजारमूल्य दर तक्त्याच्या (रेडीरेकनर) दरात कोणतेही बदल न करता २०२४-२०२५ या वर्षासाठीही तेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. रेडीरेकनरच्या दरात यावर्षीही वाढ होणार नसल्याने महसूल विभागाच्या या निर्णयाचे बारामतीच्या बांधकाम क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे.

बाजारातील जमिनीचे दर व बांधकामाचा खर्च पाहता सर्वसामान्यांना घरे परवडायला हवी असतील तर सध्या तरी रेडीरेकनरच्या दरामध्ये कुठलीही वाढ करू नये, अशी मागणी ‘महाराष्ट्र क्रेडाई’तर्फे करण्यात आली होती. दरम्यान शासनाच्या महसूल विभागाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना पत्र पाठवून २०२३-२०२४ चे दर २०२४-२०२५ या वर्षासाठीही तसेच ठेवावेत, असे कळविले आहे. ‘बारामती क्रेडाई’चे अध्यक्ष राहुल खाटमोडे, सुरेंद्र भोईटे, सिध्दार्थ जाचक, अमोल कावळे, जावेद सय्यद, राजेंद्र खराडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राहुल खाटमोडे म्हणाले, ‘‘यंदा रेडीरेकनर दरात वाढ होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. बांधकाम क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. दरवाढ करू नये अशी मागणी बारामती क्रेडाईने राज्य शासनाकडे केली होती. सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ व बदल केले नाहीत. सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. ‘क्रेडाई बारामती’च्यावतीने महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. सरकारच्या या निर्णयामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात कोरोनानंतर आलेले तेजीचे वातावरण आणखी सकारात्मक राहील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय! आई-बहिणीची शिवी दिली तर दंड आकारणार; नवा नियम लागू, दंड किती लागणार?

Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

स्ट्रेट ऑफ होर्मुज संकट; भारताला LPG कसा मिळणार? तज्ज्ञांनी सांगितले पर्याय

Latest Marathi News Live Update : व्यवसायिक सिलेंडर बंदीमुळे हॉटेल व्यवसाय संकटात; हजारो कामगारांवर बेरोजगारीचं सावट

SCROLL FOR NEXT