पुणे

करिअर निवडीसाठी सर्वोत्तम पर्याय

CD

बारामती, ता. ५ ः उज्ज्वल करिअरची निवड करण्याच्या दृष्टीने दहावी बारावीनंतर करिअरच्या असलेल्या विविध संधीची माहिती एकाच छताखाली विद्यार्थी व पालकांना मिळवून देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने शुक्रवारपासून (ता. ७) तीन दिवसीय (७, ८ व ९ जून २०२४) सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचे बारामतीत आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन प्रवेश, दहावी बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध पर्यायाची तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्र शिक्षण, कृषी, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान यासह अनेक अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली विद्यार्थी व पालकांना या एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
करिअर निवडताना पालक व विद्यार्थ्यांना अनेकदा संदिग्धता असते, कोणते क्षेत्र निवडावे, त्यात कोणत्या संधी आहेत याची माहिती या एक्स्पोच्या दालनात तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. या क्षेत्रातील मान्यवर तीन दिवसांच्या या एक्स्पोमध्ये बहुमूल्य मार्गदर्शन करतील.

जीवनात यशासाठी उच्च शिक्षण महत्त्वाचे आहे. उत्तम संस्थेतून शिक्षण घेणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावीनंतर पुरेशा माहितीअभावी विद्यार्थ्यांना नीट करिअर करता येत नाही. सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोच्या माध्यमातून परिपूर्ण मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे.
डेलॉनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील सर्वोत्तम ज्ञान देण्यास सदैव कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना हमखास प्लेसमेंट मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी हे आता सर्वश्रृत आहे.
-डॉ राजेंद्र पाटील (प्राचार्य), डेलोनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी, बऱ्हाणपूर


एक्सलन्स सायन्स ॲकॅडमी शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना IIT-JEE, NEET, MHT-CET, NDA अशा परीक्षांची तयारी करून घेण्यासोबतच एक उत्कृष्ट व्यक्ति बनविण्याचे काम करते. याचेच फलित म्हणून आमच्याकडे बारामती, सातारा, शिरूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर अशा ठिकाणाहून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यंदा सहा विद्यार्थ्यांनी NEET परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात ६५० हुन अधिक गुण संपादन केले आहेत. ३० पैकी २१ विद्यार्थ्यांनी IIT-JEE परीक्षेमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.
-प्रा. गौरव गुंदेचा, संस्थापक, एक्सलन्स सायन्स ॲकॅडमी, बारामती.

काय केव्हा कधी कुठे
• काय- सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४
• कधी- शुक्रवार ता. ७ ते रविवार ९ जून २०२४
• केव्हा- सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत
• कुठे- मुक्ताई लॉन्स, सिटीईन चौक, सूर्यनगरी, बारामती.

• अधिक माहितीसाठी संपर्क
• दत्तात्रेय- ८९७५६७३३१०
• रमेश- ८२०८५३९९४२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT