खोडद, ता. १६ : पिंपरी कावळ (ता. जुन्नर) येथे आयोजित केलेल्या एकल महिला नोंदणी मेळाव्यात ३५ महिलांनी सहभाग घेतल्याची माहिती श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे प्रमुख दीपक चव्हाण यांनी दिली.
श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राच्या माध्यमातून पिंपरी कावळ येथे गुरुवारी (ता. १५) येथे एकल महिला नोंदणी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात परिसरातील गावांमधील एकूण ३५ महिलांनी सहभाग घेतला. पिंपरी कावळ, जांबूत, औरंगपूर, पारगाव तर्फे आळे यांसह परिसरातील गावांमधील महिलांनी या मेळाव्यात उपस्थित राहून नावनोंदणी केली. या मेळाव्याच्या माध्यमातून विधवा, निराधार व घटस्फोटित महिलांसह नियमानुसार पात्र असलेल्या एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या मेळाव्याचे आयोजन श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण अध्यक्ष दीपक चव्हाण आणि पिंपरी कावळ मळगंगा बचत गटाच्या अध्यक्षा वनिता पाबळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. या उपक्रमासाठी पिंपरी गावचे पोलिस पाटील कृष्णा शिरतार, लक्ष्मण भांबिरे, दिगंबर झिंजाड, सारिका पाबळे, मंदाबाई भांबिरे, शरद भांबिरे, सूरज खिलारी यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.