पुणे

दौंड येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांकांत आजपासून बदल

CD

दौंड, ता. ३१ : दौंड जंक्शन रेल्वे स्थानकाच्या सर्व सहा फलाटांच्या क्रमांकात बदल करण्यात आला आहे. हा बदल एक ऑगस्ट २०२४ पासून लागू होत आहे.
रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाकरिता असलेल्या अमृत भारत स्थानक विकास योजनांतर्गत दौंड जंक्शन रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा ऑगस्ट २०२३ रोजी व्हिडिओ कॅान्फरन्सिंग प्रणालीद्वारे दौंड जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचा प्रारंभ केला होता. सध्या मात्र संथ वेगाने काही कामे सुरू आहेत. पुनर्विकास कामांसाठी एकूण ४४. १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानक पुनर्विकास योजनांतर्गत दौंड जंक्शन रेल्वे स्थानकाच्या आरक्षण केंद्राजवळील फलाट क्रमांक सहा आता फलाट क्रमांक एक म्हणून ओळखला जाणार आहे. नवीन फलाट क्रमांक पुढीलप्रमाणे :

दौंड जंक्शन रेल्वे स्थानक
जुना फलाट क्रमांक ........... नवा फलाट क्रमांक
१ व २ ...........३
३ ...........४
४ ...........५
५ ........... २
६ ........... १

03269

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT