पुणे

कांबळे, कंक, ओगले, नाझिरकर यांचा सासवड येथे सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

CD

सासवड शहर, ता.६ : पुरंदर पंचायत समितीमधील पंचायत समिती विस्तार अधिकारी सुहास कांबळे यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रेय कंक, रंजना ओगले आणि शिपाई नागेश नाझिरकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सेवा निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल अनेकांनी विविध आठवणीं सांगत त्यांच्या विषयी गौरोदगार काढले. सेवानिवृत्त लेखाधिकारी तथा स्वकुळ साळी समाज बांधव पंडितराव मर्ढेकर, हेमंत ताकवले, मुबारक शेख, गोरखनाथ ओगले यांनी या वेळी विचार मांडले. यावेळी बाबाराजे जाधवराव यांनी सुहास कांबळे यांच्या विषयी कौतुकास्पद मनोगत व्यक्त केले.
यावेळी मावळते गट विकास अधिकारी अमर माने, नव्याने रुजू झालेल्या गट विकास अधिकारी बॉ. अमिता पवार, गट शिक्षण अधिकारी नीलेश गवळी, सुदाम इंगळे, बबनराव कामथे, श्यामकांत भिंताडे, अलका बडदे यांसह अधिकारी, कर्मचारी व सत्कारमूर्तीचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, कांबळे, कंक, ओगले यांनीही या वेळी सत्काराला उत्तर दिले. यावेळी माळशिरसमधील एका अत्यंत गरीब कुटुंबातील मुलाला शिक्षणासाठी दत्तक घेत असल्याचे सुहास कांबळे यांनी जाहीर केले. सहायक लेखा अधिकारी जोशी काका यांनी सूत्रसंचालन केले.

07001

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय! आई-बहिणीची शिवी दिली तर दंड आकारणार; नवा नियम लागू, दंड किती लागणार?

Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

स्ट्रेट ऑफ होर्मुज संकट; भारताला LPG कसा मिळणार? तज्ज्ञांनी सांगितले पर्याय

Latest Marathi News Live Update : व्यवसायिक सिलेंडर बंदीमुळे हॉटेल व्यवसाय संकटात; हजारो कामगारांवर बेरोजगारीचं सावट

Photos : अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमुळे इराणमध्ये हाहाकार! अंतराळातून काढलेली छायाचित्रे सांगतात सत्य, नासाने जारी केले धक्कादायक 10 फोटो

SCROLL FOR NEXT