पुणे

चावंड ग्रामपंचायतीकडून पर्यटन विकास समितीची स्थापना

CD

जुन्नर, ता. २३ : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील चावंड ग्रुप ग्रामपंचायतीने संयुक्त ग्रामसभेत पर्यटन विकास समितीची स्थापना केली आहे. या वेळी एक वर्षासाठी केळी, माणकेश्वर आणि चावंड या गावांमधील १५ सदस्यांची समितीमध्ये निवड करण्यात आली.

पर्यटन विकास समितीच्या स्थापनेने चावंड परिसरातील पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. चावंड येथील प्रसन्नगड (चावंड किल्ला), माणकेश्वर मंदिर, कुंभाई माता मंदिर, विविध धबधबे आणि गावातील अनेक छोटी-मोठी पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. ‘निसर्ग संवर्धनाकडून पर्यटन विकासाकडे’ हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगून यापुढे समितीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

चावंड ग्रामपंचायत ‘पेसा’ क्षेत्रात आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शिस्तबद्ध आणि जबाबदार पर्यटन घडवून आणण्यासाठी काही नियम तयार करण्यात येणार असून परिसरात कोणतेही कार्यक्रम घेण्यासाठी समितीची पूर्व परवानगी आवश्यक करण्यात येणार आहे. याच बरोबर पर्यटकांच्या तक्रारी, समस्या आणि मदतीसाठी पर्यटन समिती सहकार्य करणार आहे.

पर्यटन विकास समितीचे पदाधिकारी व सदस्य पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष: पांडुरंग उतळे, उपाध्यक्ष: अविनाश शेळकंदे, सचिव: बबन वाळकोळी, खजिनदार: दशरथ चव्हाण, पर्यटन निवास प्रमुख: रोहिदास शेळकंदे, सदस्य: संतोष मेमाणे, निखिल उतळे, सुप्रिया शेळकंदे, संतोष लांडे, ज्ञानदेव गवारी, पुष्पा बांडे, वंदना बांबळे, ज्ञानेश्वर लांडे, एकनाथ मुंढे, रोहिदास कोरडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT