पुणे

गोदाम बांधकामासाठी करा ३१ जुलैपर्यंत अर्ज

CD

काटेवाडी, ता. १० : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत अनुदानावर गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याकरिता २५० टन गोदाम बांधकामासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्यासाठी २ व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत गळीतधान्यासाठी एका गोदाम बांधकामाचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त आहे. यासाठी प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी कमी असलेली अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही योजना बँक कर्जाशी निगडीत असल्याने अर्जदारांनी प्रस्ताव सादर करताना केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी, संघ या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करताना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाइन्स, तपशील व खर्चाच्या अंदाजपत्रकासह अर्ज सादर करावेत.

शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी अर्जासोबत सभासद यादी, मागील वर्षीचे ऑडीट रिपोर्ट व ७/१२, ८ अ उतारा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
-संजय काचोळे, अधीक्षक, कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: ५ कोटींच्या सोन्याची तस्करी, भाजप नेत्यासह ७ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

Police Adhikshak Tushar Patil Death : अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन; वयाच्या ४५ व्या वर्षी प्राणज्योज मालवली

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

SCROLL FOR NEXT