पुणे

एमआयटीच्या छात्रअध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे धडे

CD

लोणी काळभोर, ता. १५ : वाढता अभ्यासाचा ताण आणि पालकांच्या अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चच्या छात्रअध्यापकांकडून जनजागृती करण्यात आली. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त येथील कन्या प्रशालेत ‘संवेदनशीलता : मानसिक आरोग्याची’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले.
आजच्या स्पर्धात्मक युगात गुणांच्या दबावामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम या पथनाट्यातून मांडण्यात आले. विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे किती आवश्यक आहे, याची जाणीव यातून करून देण्यात आली. केवळ गुणांवर आधारित यशाचे मूल्यमापन न करता, पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजांना प्राधान्य द्यावे, असा संदेश या वेळी देण्यात आला.
या प्रसंगी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता भालेराव, शिक्षक, विद्यार्थी तसेच एमआयटीचे प्राध्यापक उपस्थित होते. विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस. आणि प्रोव्होस्ट डॉ. सायली गनकर यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि प्राचार्या डॉ. प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सोलापूरच्या 'मटका किंग'चं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून उडाळी खळबळ, मंदिरातील अनागोंदी कारभाराविरोधात संताप

South Solapur News: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोळी कुटुंबाच्या मदतीला धावले महादेव कोगनुरे

Latest Marathi News Update : ज्ञानेश कुमारांमुळे मोदी सत्तेत आले : अभिजीत दिपके

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT