पुणे

आंबळे येथे उभारला जिवामृताचा प्रकल्प

CD

माळशिरस, ता. १३ : ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पुणे येथील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी आंबळे गावातील विठ्ठल रामचंद्र जगताप यांच्या गोशाळेमध्ये भेट देऊन प्रगत जीवामृत प्रकल्प उभारला.

जीवामृत हे शेतीला वरदान असून, नैसर्गिक शेतीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. पिकांना लागणारे अन्नघटक विरघळून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम सूक्ष्म जिवाणू करतात. जीवामृताच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. याचा वापर जगताप यांनी त्यांच्या शेतात केला असून, इतर शेतकऱ्यांनीदेखील याचा अवलंब करून शेतजमिनीचे आरोग्य जपावे, असा संदेश कृषीकन्यांनी दिला.

या उपक्रमाचे संयोजन कांचन भालेकर, गौरी भापसे, सुजाता धूळगंड, गावडे प्रियांका, जाधव दीप्ती, शीतल जाधव, गायत्री खतोडे, अनुराधा मधवे, माधुरी पवार, आकांक्षा थोरात, साक्षी तोरमड यांनी केले होते. या उपक्रमासाठी कृषीकन्यांना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. डी. मासाळकर, केंद्र समन्वयक डॉ. व्ही. जे. तरडे, केंद्रप्रमुख डॉ. यू. डी. जगदाळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. डी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Bike Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Xiaomi 17 Price : भारतात लाँच झाला शाओमी 17 स्मार्टफोन; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स..

SCROLL FOR NEXT