पुणे

मालिकेतील अभिनयाला पुढील ५ वर्षे ‘राम- राम’

CD

नारायणगाव, ता. १० : ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या सेवेसाठी व मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी मालिका क्षेत्रातील अभिनयाला मी पूर्णपणे ‘राम- राम’ करण्याचा निर्णय घेतला आहे,’’ अशी ग्वाही शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर गायब खासदार, नटसम्राट असा शिक्का विरोधकांनी निवडणूक प्रचारात लावला. सामाजिक माध्यमातून हाच मुद्दा विरोधकांनी प्रचारात लावून धरला आहे. त्यावर, ‘खासदाराचे काम दिल्लीत असते गल्लीबोळात नसते’ असे सांगण्याचा प्रयत्न डॉ. कोल्हे यांनी केला. याबाबत ते म्हणाले, ‘‘माझ्या विरोधात प्रचार करण्याचा कोणताही मुद्दा विरोधकांकडे शिल्लक नाही. मागील पाच वर्षे मी निःस्वार्थी भावनेने काम केले आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. माझा विजय निश्चित आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी माझ्या मालिका क्षेत्रातील अभिनयाला मी पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या सेवेसाठी, मतदार संघातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT