पुणे

नारायणगावात शेतकऱ्यांसाठी उद्या प्रशिक्षणाचे आयोजन

CD

नारायणगाव, ता. १७ : नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) नारायणगाव (ता. जुन्नर) येथे बुधवारी (ता. १९) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नैसर्गिक निविष्ठा निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती केव्हीकेचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली. डॉ. शेटे म्हणाले की, ‘‘नैसर्गिक शेतीचे महत्त्व वाढत आहे. कमी खर्चात, पर्यावरणाला अनुकूल व गुणवत्तापूर्ण नैसर्गिक निविष्ठा शेतकऱ्यांना घरच्या घरी कशा बनवता येतील, या बाबत प्रशिक्षणात प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकरी शेतात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीपासून जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क आदी नैसर्गिक निविष्ठा तयार करून शेतीसाठी वापरू शकतात. यामुळे भांडवलात बचत होण्यास मदत होणार असून, शेती अधिक समृद्ध व विषमुक्त करण्यासाठी मदत होईल.’’ अधिक माहितीसाठी डॉ. योगेश यादव (मृदाशास्रज्ञ) (८२७५००५२१२), राहुल घाडगे (कृषी विस्तार तज्ञ) (९४२२०८००११) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Update : 'एल-निनो'चं संकट टळलं! अवघ्या 2 आठवड्यांत बदललं चित्र; कोयना धरण 80 टीएमसीच्या उंबरठ्यावर, 'कृष्णा'काठच्या शेतीचा प्रश्न मिटणार

Kargil Vijay Diwas: देशासाठी बलिदान, पण कुटुंबाला विसरले सरकार? कारगिल वीराच्या आईची हृदयद्रावक व्यथा, २७ वर्षांनंतरही पूर्तता नाही

Latest Marathi News Live Update : कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून संपविले जीवन; राळेगावमधील दुर्दैवी घटना

Madhya Pradesh Paper Leak: पेपर लीक प्रकरणांचा निकाल आता अवघ्या ३ महिन्यांत! MP मध्ये स्थापन होणार ४ विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट!

Mumbai News: मुंबईतील बेकरींवर एफडीएचा मोठा छापा; ६ परवाने निलंबित, ४ दुकाने बंद करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT