राजगुरुनगर, ता. १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित ‘सृजनरंग’ साहित्यिक व सांस्कृतिक जिल्हास्तरीय स्पर्धेत साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. वक्तृत्व व निबंध स्पर्धेत प्रथम, काव्यवाचनात द्वितीय, तर पोवाडा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मराठी वक्तृत्व स्पर्धेत सिद्धार्थ डोंगरे याने, तर मराठी निबंध स्पर्धेत दिव्या मुळूक हिने प्रथम क्रमांक पटकावला. तनुजा काचोळे हिने काव्यवाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. पोवाडा स्पर्धेत सुयशा हुलावळे, तन्वी मोरे आणि पीयूष तांबे यांनी तृतीय क्रमांक मिळवत सांघिक यश संपादन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. जी. जी. आहेरकर आणि मराठी विभागप्रमुख प्रा. जयश्री बडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या निमित्ताने या दोन्ही प्राध्यापकांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.