पुणे

पालकमंत्री पाटील यांचा गुरुवारी शिरूरचा दौरा

CD

शिरूर, ता. १० : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी (ता. १३) शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्‍घाटन व भूमीपूजन होणार आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी या दौऱ्याची माहिती दिली. गुरुवारी सकाळी दहा वाजता विठ्ठलवाडी येथून पाटील यांच्या दौऱ्याला सुरवात होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेचे व विठ्ठलवाडी गावातील विविध विकास कामांचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे ३५० कोटी रुपये खर्चाच्या न्हावरे-चौफुला या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार असून, दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता शिरूर पंचायत समितीच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात पाटील हे तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर तेथेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
सायंकाळी चार वाजता न्हावरे फाटा येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यात पाटील मार्गदर्शन करणार असून, बुथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी काही पक्षप्रवेश होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात होणाऱ्या सोहळ्यात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांचा भीमरत्न पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gas Crematorium Closed : पुण्यातील स्मशानभूमीला इराण- इस्रायल युद्धाच्या झळा; गॅस दाहिन्या बंद, अंत्यसंस्कार वेटिंगवर

Bavdhan Bhairavnath Yatra : 10 बैलजोड्यांनी ओढला 40 फुटी रथ! बावधनच्या बगाड यात्रेचे हे खास वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे का? 16 वर्षांपूर्वीचा 'तो' नवस फेडण्यासाठी...

Whatsapp Chat Recovery : डिलीट झाली Whatsapp चे महत्वाचे चॅट? आता टेंशन घेऊ नका; मिनिटात मिळेल परत, नव्या सुविधेने युजर्स चक्रावले

T20 World Cup: हार्दिक पांड्याने सांगितला भविष्यातील प्लॅन! म्हणाला, तीन ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत, आता...

Sayali Surve Gharwapsi : प्रेमासाठी बदलला धर्म! 10 वर्षात झाली 4 मुलं, पण नवऱ्यानं..; पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी, तिच्यासोबत सासरी असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT