Married couple drown Sakal
पुणे

Otur Crime : तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मेंढपाळ नवदांपत्याची आत्महत्या

तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मेंढपाळ नवदांपत्याने पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील नवलेवाडी येथे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मेंढपाळ नवदांपत्याने पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील नवलेवाडी येथे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

ओतूर - तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मेंढपाळ नवदांपत्याने पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील नवलेवाडी येथे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. २४) उघडकीस आली. मनीषा सोमनाथ कुलाळ (वय २०) व सोमनाथ संभाजी कुलाळ (वय २५, मूळ रा. जांभूत, ता. संगमनेर, जि. नगर; सध्या रा. पिंपरी पेंढार), असे या दांपत्याचे नाव असल्याची माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

कुलाळ हे मेंढपाळ दांपत्य मेंढ्यांसह पिंपरी पेंढार गावाच्या नवलेवाडी परिसरात वास्तव्यास होते. गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या पती-पत्नीने नवलेवाडी येथे विहिरीमध्ये उड्या मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर जुन्नर येथील रेस्क्यू टिम, ओतूर पोलिस व स्थानिक नागरिक यांनी विहिरीतून त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

मनीषा आणि सोमनाथ यांचा २२ डिसेंबर २०२२ रोजी विवाह झाला होता. या दोघांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. मात्र, किरकोळ वादातून ही आत्महत्या झाली असल्याची चर्चा या परिसरात आहे. ओतूर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे. याबाबत रामा बिंदू डोमारे यांनी ओतूर पोलिसांत खबर दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT