पुणे

जुन्नरमधील पाच शाळांना नऊ ई-लर्निंग संच भेट

CD

ओतूर, ता.३ : सकाळ माध्यम समूहातील सकाळ इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून व पुण्यातील डिजिटल हेल्थ केअर क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या रोश इन्फॉर्मेशन सोल्युशन इंडिया प्रा.लि.या कंपनीच्या सहकार्याने जुन्नर तालुक्यातील पाच गरजू शाळांना नऊ ई-लर्निंग संच अभ्यासक्रमासह ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज शिक्षण संकुलात नुकतेच वाटप करण्यात आले.
यावेळी सकाळ इंडिया फाउंडेशन तर्फे ओतूर येथील संत गाडगेमहाराज माध्यमिक विद्यालयाला तीन ई - लर्निंग संच, तसेच ओतूर येथीलच श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळेला दोन संच. तर पिंपळगाव जोगा येथील संत गाडगे महाराज विद्या निकेतन माध्यमिक शाळेला दोन संच आणि धावशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला व उदापूर येथील कुलवडेमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रत्येकी एक संच असे एकूण नऊ ई - लर्निंग संच अभ्यासक्रमांसह वाटप करण्यात आले. तसेच यावेळी संबंधित शाळेच्या शिक्षकांना ई -लर्निंग संचाचा वापरून मुलांना अभ्यासक्रमाचे अध्यापन करण्याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले.

यावेळी सूर्यदत्त ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूटस्चे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय चोरडिया, उपाध्यक्षा स्नेहल चोरडिया, ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, विस्तार अधिकारी मंगल डुंबरे, सुशीला डुंबरे, गाडगे महाराज शिक्षण संकुल ओतूरचे संचालक नितीन पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी सचिन कांडगे यांनी सकाळ सोशल फाउंडेशन व सकाळ इंडिया फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून, ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, याच विद्यार्थ्यांमधून पुढे उद्याचे मोठे अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर व सायंटिस्ट घडतील असा विश्वास व्यक्त केला.
तसेच यावेळी डॉ. संजय चोरडिया यांनी श्री संत गाडगे महाराज शिक्षण संकुलातील व आश्रम शाळेतील व्यवस्था पाहून येथील विद्यार्थ्यांना सकाळ सोशल फाउंडेशनच्या शिफारशीतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थांसाठी राकेश शर्मा व कल्पना चावला शिष्यवृत्ती अशा दोन प्रत्येकी ११ हजार रुपयांच्या शिष्यवृत्ती स्व:खर्चाने सुरू करत असल्याचे यावेळी जाहीर केले.
यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थी, संबंधित शाळांचे शिक्षक उपस्थित होते. रवींद्र अहिनवे यांनी सूत्रसंचालन तर शोभा तांबे यांनी आभार मानले..


04666

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT