पुणे

सम्राट अशोक चषकावर तांदूळवाडी संघाची मोहोर

CD

वालचंदनगर, ता. ५ : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे वालचंद हिराचंद यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सम्राट अशोक चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये तांदूळवाडी (ता. बारामती) येथील संघाने टेंभुर्णीच्या संघाचा १८ धावांनी पराभव करून सम्राट अशोक चषक पटकावला.

इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद सुनील साबळे यांनी वालचंद उद्योग समुहाचे संस्थापक वालचंद हिराचंद यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सम्राट अशोक चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ३२ संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना तांदूळवाडी (ता. बारामती) विरुद्ध टेंभुर्णी (ता. सोलापूर) या संघांमध्ये झाला. यामध्ये तांदूळवाडी संघाने टेंभुर्णी संघाचा १८ धावांनी पराभव केला.

स्पर्धेचे उद्‍घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह चौधरी यांच्या हस्ते झाले. या वेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबा निंबाळकर, राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश युवकाध्यक्ष रविराज खरात, वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड, वालचंदनगर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ, नवनाथ धांडोरे, रोहित गायकवाड, पोपट मिसाळ, शैलेश फडतरे, प्रशांत पवार, महेश बोंद्रे आदी उपस्थित होते. स्पर्धेला वालचंदनगरचे पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निवास शेळके, हर्षवर्धन गायकवाड, रोहित झेंडे, गणेश धांडोरे, शेखर काटे, आकाश भोसले, संदीप भोसले, विजय चितारे यांनी हजेरी लावली.

स्पर्धेतील विजेते संघ
प्रथम - तांदूळवाडी संघ, द्वितीय - टेंभुर्णी संघ, तृतीय - मुळशी संघ, चतुर्थ - इंदापूर संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil India Andaman Gas: मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडलं ऊर्जेचं भांडार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती

Women Deportation: ‘विदेशी’ ठरवलेल्या महिलांच्या हकालपट्टीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; केंद्र सरकारकडे मागितलं उत्तर, प्रकरण काय?

Deglur Lightning Strike : वीज कोसळून गोठ्याला आग; २२ शेळ्या, १५ पिल्ले व २० कोंबड्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचे आठ लाखांहून अधिक नुकसान

IND vs AFG: ६ जूनच्या कसोटीपूर्वी गंभीरचं धक्कादायक विधान; म्हणाला, "सध्या भारतीय संघाकडून जास्त अपेक्षा..

Sahyadri Sugar Factory : सह्याद्री बचाव समितीचा कारखाना प्रशासनाला इशारा; अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT