पुणे

‘पुणे ग्रँड टूर’मुळे गावांना मिळणार आंतरराष्ट्रीय ओळख

CD

वाल्हे, ता. ९ : ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भाग थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचत आहे. या स्पर्धेमुळे आपल्या गावांचा विकासात्मक आणि सांस्कृतिक चेहरा जगासमोर मांडण्याची संधी मिळत आहे. परदेशी स्पर्धकांचे स्वागत महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे, पारंपरिक खेळ, ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात करावे, स्वागत करताना आपली परंपरा जपत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केल्यास ही स्पर्धा एक आदर्श ठरेल. जनतेच्या सहभागातूनच ही स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नीरा (ता. पुरंदर) येथील स्पर्धा मार्गाची जिल्हाधिकारी डुडी यांनी शुक्रवारी (ता. ९) पाहणी केली. यावेळी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. पाहणीदरम्यान नीरा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी जिल्हाधिकारी डुडी यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, मंडल अधिकारी बापूसाहेब देवकर, योगेंद्र माने, अनिल चव्हाण, ॲड. पृथ्वीराज चव्हाण, दीपक काकडे, अनंता शिंदे, विजय शिंदे, प्रमोद काकडे, दयानंद चव्हाण, तुकाराम जगताप आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षिततेकडे विशेष लक्ष’
सायकल स्पर्धा नीरा गावातून जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून ग्रामपंचायत, प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. परदेशी स्पर्धकांचे स्वागत महाराष्ट्राच्या परंपरेनुसार शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने केले जाईल. तसेच गावाची स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन व सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाईल, असा विश्वास तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी व्यक्त दिला.

वाल्हे येथे स्वागताची तयारी; मात्र ताफा थांबला नाही
‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या मार्गाची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा नीरा येथून वाल्हे मार्गे पुढे जात होता. यावेळी ग्रामपदाधिकारी व ग्रामस्थ स्वागतासाठी हार, शाल व पुष्पगुच्छ घेऊन उन्हात रस्त्यालगत थांबले होते. मात्र, ताफ्याने कोणताही थांबा न घेता पुढे प्रवास सुरू ठेवल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटले. स्पर्धेदरम्यान निर्माण होणाऱ्या समस्या, वाहतूक अडथळे व स्थानिक अडचणी मांडण्याची संधी मिळाली नाही, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली असून प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी अपेक्षा सचिन लंबाते यांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

6160

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT