पुणे

नागिणीच्या पानांची भैरवनाथ मंदिरात आरास

CD

वाल्हे, ता. १८ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील श्री भैरवनाथ मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला ग्रामदैवताचा शिणवटा काढण्यासाठी नागिणीच्या पानांची आकर्षक आरास करण्यात आली होती. देवाला थंडावा मिळावा या श्रद्धेतून केली जाणारी ही विशेष सजावट भाविकांसाठी आकर्षण ठरली.
श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता. १८) सचिन आगलावे यांनी ग्रामदैवताच्या मूर्तीभोवती नागिणीच्या पानांची कल्पकतेने आरास केली. हिरव्यागार पानांच्या सजावटीमुळे ग्रामदैवताचे रूप अधिकच खुलून दिसत होते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. नवरात्रोत्सवात मंदिरात घटस्थापना करून नऊ दिवस काकड आरती, पूजा आणि विविध धार्मिक विधी केले जातात. सकाळी ग्रामदैवताला दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर ग्रामदैवताला आकर्षक पोशाख परिधान केला जातो.
नवरात्रोत्सवात रात्री गुलालाची उधळण करत रंगणारा छबिना हा ग्रामस्थांच्या उत्साहाचा केंद्रबिंदू ठरतो. शनिवारी (ता. १७) आठव्या माळेच्या निमित्ताने धनगर समाज बांधवांनी पारंपरिक गजेघाय नृत्य सादर करत छबिन्याच्या जागरात सहभाग
घेतला. या पारंपारिक नृत्यात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रविवारी (ता. १८) सकाळी भुजबळ कामठवाडी येथील सोनबा भुजबळ यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपुरात १०० एकरवर ‘पल्स प्रोटिन पार्क’; ५०० कोटींच्या गुंतवणुकीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Successful Kidney Transplant: पतीच्या नवजीवनासाठी पत्नीचा त्याग! हसीना शेख यांनी किडनी दान करून अस्लम यांना दिले जीवनदान, त्यागाची भावस्पर्शी कहाणी..

Latest Marathi News Live Update : अंकिता भंडारी हत्या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा यासाठी पाटियाला कोर्टाबाहेर निदर्शने

Majalgaon Telgaon Road Accident : माजलगावजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू, तुळजापूरला देवीच्या दर्शनला निघाले पण...

Kolhapur Mangav Murder Case : मंदिरातून परतताना अल्पवयीन मुलगीचा धारदार शस्त्राने खून, कोल्हापुरातील माणगाव धक्कादायक घटना; आरोपीचा अद्यापही शोध नाही

SCROLL FOR NEXT