पुणे

लैंगिक छळप्रकरणी सक्तमजुरी

CD

पुणे, ता. ६ : एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्याला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला. अमित सुरेश आहेर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.
आहेर हा संबंधित मुलींच्या आईच्या ओळखीचा आहे. त्याने केलेल्या कृत्यांची माहिती मुलींनी त्यांच्या मावशीला दिली. त्यानंतर, मावशीने आरोपी विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. दोन पैकी एक मुलगी खटला सुरू असताना फितूर झाली होती. मात्र, दुसऱ्या मुलीची साक्ष तसेच फिर्यादी मावशी व तपासी अंमलदार एन. ए. डावरे यांची साक्ष गुन्ह्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजात सरकार पक्षाला भोसरी पोलिसांनी मदत केली सहकार्य केले. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT