पुणे

गुरू बहादूर यांनी सर्व समाजासाठी काम केले

CD

पुणे, ता. १५ : "मानवाधिकार ही कळीची संकल्पना आहे. अमेरिका या मुद्द्यावर परराष्ट्र नीती करते. याच कारणावरून चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. गुरू तेग बहादूर यांनी याच मानवता धर्माचे पालन करून सर्व समाजासाठी काम केले,'''' असे मत महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

सरहद संस्था, पुणे आणि श्री गुरू तेग बहादूर जी ४०० वे प्रकाश पर्व, आंतररराष्ट्रीय समिती आयोजित ‘गुरू तेग बहादूर जी‘ या पुस्तक प्रकाशन आणि ‘गुरू तेग बहादूर जी‘ मानवता सन्मान सोहळ्यात डॉ. मोरे बोलत होते.


यावेळी केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सरहद संस्थचे संस्थापक संजय नहार, समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संतसिंग मोखा, चंद्रजित सहानी आदी उपस्थित होते. डॉ. अशोक कामत, भारत देसडला, दिलबागसिंग बिर, नीलेश नवलाखा, गौतम कोतवाल यांना गुरू तेग बहादूर जी मानवता सन्मान या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक नहार यांनी केले. आभार सहानी यांनी मानले.
यावेळी शिंदे म्हणाले, ‘तेग बहादूरांनी धर्म रक्षणाचेच नव्हे, तर समाज रक्षणाचे ही मोठ कार्य केले आहे. मानवतेची पूजा करणाऱ्याला वंदन केले पाहिजे. परमेश्वराने प्रत्येकाला बुध्दी दिली आहे. तीचा योग्य उपयोग केला पाहिजे‘.

शिवाजी महाराज आणि तेग बहादूर जी यांचे कार्य समान होते. समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द ते उभे राहिले. आसाममधील नागरिकांना अन्याया विरुद्ध लढण्याची प्रेरणा बहादूरांकडून मिळाली‘. मानवाचे वेगवेगळे अधिकार आहेत. त्यातला एक अधिकार स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा हा त्यातला एक अधिकार आहे.
-डॉ. सदानंद मोरे, साहित्यिक

‘गुरू तेग बहादूर जी‘ या पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केला आहे. पुस्तकात बहादूरजी यांचा अल्पजीवन, कथा आणि गुरू ग्रंथ साहिबमधील त्यांची पद्य आहेत.
- संजय नहार, संस्थापक सरहद संस्था

PNE22S35870

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Extortion Case : पोलीसच खंडणी वसूल करु लागले तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचे? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी

Nirmala Sitharaman Photo Fraud : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो पाहून तब्बल 43 लाख गमावले! महिलेच्या 'या' चुकीमुळे बँक खाते रिकामे, अशी झाली फसवणूक

Maharashtra Shetkari Karjmukti Yojana 2026: शेतकरी कर्जमाफीच्या GR मध्ये काय? फायदा-तोटा कुणाचा? सोप्या शब्दात गणित समजून घ्या...

'खलनायक'चा सिक्वेल येणार? ३३ वर्षांनंतर संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ पुन्हा एकत्र

"म्हणून नव्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडतं"- सई ताम्हणकर

SCROLL FOR NEXT