पुणे

पुण्यातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश; जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

CD

पुणे, ता. २२ : जिल्ह्यात १५ ते १७ वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणात ग्रामीण भागाने आघाडी घेतली असून, पात्र लाभार्थींपैकी सुमारे ८० टक्के मुलांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्या तुलनेत पुणे शहरातील विद्यार्थ्यांचे लसीकरण खूप कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शहरात मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवा, असा आदेश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाचा प्रतिबंधासाठी करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. पवार म्हणाले, ‘‘शहर व जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार सुरु करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. याबाबत संबंधित रुग्णालयांना सूचना द्याव्यात. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध खाटांच्या योग्य नियोजनाकडे लक्ष द्यावे.’’

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींसह शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
या बैठकीपूर्वी पवार यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन यांनी हवेली तालुक्यातील उरुळी कांचन गावासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
करण्यात आले. उरुळी कांचन येथील श्री प्रयागधाम ट्रस्टतर्फे शहरातील गरीब नागरिकांसाठी ३०० चादरी भेट देण्यात आल्या.

सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढली
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीची बैठकीत माहिती दिली. पुणे जिल्ह्यात मागील आठवड्याच्या तुलनेत सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत ३२ हजार ९२२ ने वाढली आहे. १५ ते १८ वयोगटातील ५१ टक्के मुलांचा कोरोना प्रतिबंधक लशीचा पाहिला डोस पूर्ण झाला आहे. पुणे शहरात रक्षक नगर येथील क्रीडा संकुलात २७५ खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले त्यांनी सांगितले.

पुणे शहरातील अधिकाधिक कोरोना रुग्ण
घरच्या घरीच उपचार घेत असले, तरी वाढता संसर्ग लक्षात घेऊन कोविड केअर सेंटरमधील यंत्रणा आतापासूनच सज्ज ठेवावी. कोरोना रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस द्यावा आणि खासगी कंपन्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावे.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update :Mumbai live : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत महत्त्वाची घोषणा

Maharashtra Budget: महाराष्ट्राचे नवे गुंतवणूक व सेवा धोरण जाहीर! 4 लाख उच्च-कुशल रोजगारांचे लक्ष्य; उद्योगांना काय फायदे?

Long Life Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक 100 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगतात; सत्तरीनंतरही 'नो आजार', राहतात एकदम निरोगी

Second Solar Eclipse 2026: एक झालं आता दुसरं सूर्यग्रहण कधी? तारीख, वेळ जाणून घ्या! भारतावर याचा काय परिणाम

OC Policy: गृहनिर्माण संस्थांसाठी गुड न्यूज! बीएमसी लवकरच लागू करणार नवी ओसी पॉलिसी; नवे धोरण कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT