पुणे

पर्यटनाच्या नावाखाली सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

CD

पुणे, ता. १ ः पर्यटन व्यवसायाच्या नावाखाली सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्या परराज्यातील टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. येरवडा व विमाननगर परिसरात हा प्रकार सुरू असताना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सुत्रधारासह दलाला अटक केली. तसेच दोन तरुणींची सुटका केली.

कुलदिप प्रसाद मोहनप्रसाद महतो (वय २६, रा. डोंगरीपाडा, ठाणे, मुळ रा. झारखंड), जयशंकर प्रसाद रमेश साव (वय २०, रा. जकॉब सर्कल मुंबई, मुळ रा. झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पर्यटनाचा व्यवसाय करणाऱ्या कारचा उपयोग करून काही व्यक्ती शहरातील वेगवेगळ्या भागात वेश्‍याव्यवसायासाठी तरुणींना आणत असल्याची खबर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर विभागाच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषण करून दोन्ही संशयित आरोपींचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर बनावट ग्राहकाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, आरोपींनी संबंधित ग्राहकास विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये खोल्या घेण्यास सांगितले. त्यानुसार, ग्राहकाने खोल्यांची नोंदणी केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक माने, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलिस कर्मचारी राजेंद्र कुमावत, राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, अण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे यांच्या पथकाने सोमवारी संबंधित हॉटेलभोवती सापळा रचला. त्यानंतर सायंकाळी ‘टुरिस्ट व्हेईकल’ असा उल्लेख असलेली कार तेथे दाखल झाली. त्यावेळी पोलिसांनी संबंधित कारमधून उतरलेल्या महतो, साव यांना ताब्यात घेण्यात आले, तर त्यांच्यासमवेत असलेल्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली. महतो व साव यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी ते ‘टुरिस्ट व्हेईकल’ चालवीत असल्याचे भासवून परराज्यातील महिला, तरुणींकडून जबरदस्तीने वेश्‍या व्यवसायास करून घेत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : 'एक पेड बाप के नाम' गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा संकल्प

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT