International Women Day 2022 ेोकोत
पुणे

महिला दिनानिमित्त युवती व महिलांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) प्रस्तुत व फाईन ज्वेलरी क्षेत्रातील जोस आलुक्कास यांच्या सहकार्याने सामाजिक बदलांसाठी, महिलांच्या विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर ‘चॅम्पियन द चेंज- संवाद महिलांचा, महिलांसाठी’ ही दोन दिवसीय ऑनलाइन मोफत मार्गदर्शन कार्यशाळा शुक्रवार (ता. ११) व शनिवारी (ता. १२) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत झूम वेबिनार स्वरूपात आयोजित केली आहे. या उपक्रमास जोस आलुक्कास यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
शुक्रवारच्या कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. माधुरी कानिटकर (लेफ्टनंट जनरल पीव्हीएसएम, एव्हीएसएम व व्हीएसएम सेवानिवृत्त) तर शनिवारच्या कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.(International Women Day)

या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांसाठी व खास करून महाविद्यालयीन युवतींसाठी प्रोत्साहन, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या निवडक यशस्वी मार्गदर्शक महिला प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने बदल घडवण्याची इच्छा असलेल्या महाविद्यालयीन युवक- युवतींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरून त्या सर्वत्र शिकतील, नेतृत्व करू शकतील आणि स्वतःचा तसेच समाजाचा विकास करू शकतील. या कार्यशाळेच्या माध्यमातून युवतींना त्यांच्या जीवनाचा रोडमॅप तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.

असे व्हा सहभागी...
या मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक व क्यूआर कोड ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT