पुणे

मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती जप्त करा ः किरीट सोमय्या

CD

पुणे, ता. १ : ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती जप्त करा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी येथे केली.

मुश्रीफ यांच्या बेनामी मालमत्तेची यादी पुन्हा आयकर विभागाला दिलेली आहे. मुश्रीफ परिवाराची शंभर कोटी रुपयांहून अधिक बेनामी मालमत्तेचा तपशिल दिला आहे. त्यांनी मनिलॉँड्रिंग केले. त्यात ४७ कंपन्यांकडून पैसे आले, त्यात पुढे गेल्यास तो आकडे शंभर कोटी रुपयांहून अधिक होईल. ही सगळी बेनामी संपत्ती जप्त केली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
सॅलिसबरी पार्कमधील आयकर सदनमध्ये शुक्रवारी सोमय्या आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितले.
सोमय्या म्हणाले, ‘‘हा पैसे कोणत्या पद्धतीने आला आहे, याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे-पवार सरकारची आहे. पैसा मनिलाँड्रिंग झाल्याने आयकर विभाग कारवाई करेल. त्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि कंपनी मंत्रालयदेखील करेल.’’ मुश्रीफ यांच्या विरोधात केंद्राने पुण्यात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. मुश्रीफ यांच्यावर कारवाया सुरू झालेल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोटाळेबाजांवर कारवाई कधी करणार, असेही त्यांनी विचारले.

ठाकरे-पवार परिवार घोटाळेबाज
सोमय्या म्हणाले, ‘‘ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ठाकरे-पवार कारवाई करणार नाहीत. कारण, हे दोन्ही परिवार स्वतःच घोटाळेबाज आहे. त्यांच्यावर कारवाई करायला गेल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई करावी लागेल. जरंडेश्‍वर साखर कारखाना प्रकरणावर पवार परिवारावर कारवाई झाल्यास बंद पडेल, असा भ्रम तयार केला जात आहे. कारखाना बंद पडणार नाही. कारखान्याचे मालक जे पवार परिवार झाले आहेत, त्या ऐवजी २७ हजार शेतकरी होणार आणि कारखाना तसाच सुरू राहणार.’’

सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी
सॅलिसबरी पार्क येथील आयकर सदन येथे खासदार किरीट सोमय्या होते. परिसरात पोलिस बंदोबस्त होता. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सदनाच्या आवारात जमा झाले होते. त्याचवेळी दुचाकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन झेंडे घेऊन तीन तरुण आयकर सदनच्या दारात आले. तेथे त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.

चौकशीला योग्य सहकार्य करू ः मुश्रीफ
कोल्‍हापूर : आयकर विभागाने यापूर्वीही माझी चौकशी केली आहे. मागील सहा, सात महिने ही प्रक्रिया सुरुच होती. आताही जी काही चौकशी होईल, त्याला आपण सामोरे जाऊ. तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य करू, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
भाजप नेते किरीट सोमय्‍या यांनी ट्वीट करत संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याबाबत कारवाईसाठी आयकर विभागाची भेट घेणार असल्याचे म्‍हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT