पुणे

फुरसुंगीत जलपर्णी वाढल्याने साथीच्या आजारांना निमंत्रण

CD

फुरसुंगी, ता. ६ : नाल्यांमध्ये जलपर्णी वाढल्याने फुरसुंगीतील नालेसफाईच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. येथील नाल्यांमधील जलपर्णी काढून वाहणाऱ्या पाण्याचा अडथळा दूर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
येथील स्मशानभूमीलगत असणाऱ्या नाल्यामध्ये जलपर्णीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नाल्यात उगवलेल्या वनस्पतीमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. गावातील ओढ्यांमधून सांडपाणी वाहत आहे. पुढील बाजूस पाणी वाहून जाण्यास अडथळा होत असल्याने मागील बाजूस घाण पाणी साठून राहते. त्यामुळे नाल्यातून दुर्गंधी पसरत आहे. पाणी साठून राहिल्याने डास आणि माश्यांचे प्रमाण वाढत आहे. जवळच स्मशानभूमी आहे. नागरिक या ठिकाणी अंत्यविधीसाठी येत असतात. अशा वेळेस ते तासन््तास बसत असतात. त्यांना येथून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास जाणवत आहे. डासांमुळे साथीच्या आजारांची भीती वाढत असल्याने येथील जलपर्णी काढून पाण्याचा अडथळा दूर करावा, असे येथील स्थानिक नागरिक जीवन कामठे, गणेश कामठे, आकाश पवार यांनी सांगितले.
नागरिक संतोष हरपळे म्हणाले, ‘‘महापालिकेची नालेसफाई केवळ दिखावू आहे. केवळ दर्शनी भागाची सफाई केली जात आहे. संपूर्ण नाल्याची सफाई करून मोहीम सातत्याने राबवणे आवश्यक आहे. औषध फवारणीने निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण गावाला साथीच्या रोगाला सामोरे जावे लागेल. महापालिका कर्मचाऱ्यांवर अंकुश राहिला नाही. फोनदेखील उचलत नाहीत.’’
दरम्यान, नालेसफाई विभागाचे अभियंता प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ न शकल्याने माहिती मिळू शकली नाही.

फुरसुंगी : परिसरातील नाल्यांमध्ये जलपर्णीचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीतला विमानतळावरून अधिकाऱ्यांनी अज्ञातस्थळी नेलं, संपर्क होईना; CJPच्या दाव्याने खळबळ, आंदोलनाला परवानगी

IND vs AFG, Playing XI: भारतीय संघाने जिंकला टॉस, रवींद्र जडेजाच्या जागेवर पदार्पण करणारा मानव सुतार कोण?

Khan Sir Patna Controversy: पोलिसांनी रात्रभर घेतला शोध, खान सर पळत राहिले; कोचिंग गुरूला अटक होणार? की न्यायालयात आत्मसमर्पण?

कारने धडक देताच दुचाकीवरील चौघे हवेत उडाले, चिमुकलीसह चौघांचाही जागीच मृत्यू; घटनास्थळी रक्ताचा सडा

IND VS PAK: भारताचा पाकिस्तानवर हॉकीत रोमहर्षक विजय; आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT