पुणे

शेतकरी, युवकांच्या प्रश्नावर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन

CD

पुणे, ता. १० : युवकांमधील बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. २०) रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे. राज्यभरातून २० ते २५ हजार युवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.
प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रशांत ओगले, महिला उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, अक्षय जैन, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाठ आदी उपस्थित होते.
मितेंद्र सिंग म्हणाले, ‘‘युवक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या या लढाईत राज्याच्या प्रत्येक तालुक्यातून तरुण सहभागी होणार आहेत. तरुणांना ‘प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये सीमित करण्याच्या मोदी-अदानी युतीच्या षडयंत्राला जाब विचारण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! सलग 10 व्या दिवशी दर घसरले; उच्चांकापासून 29,000 रुपयांनी स्वस्त, आज महाराष्ट्रात किती भाव?

Ajanta Ghat Road : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! अजिंठा लेणी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार; भूसंपादनासाठी राजपत्र होणार प्रसिद्ध, नव्या रस्त्याचा काय आहे प्लॅन?

Latest Marathi News Live Update : ठाणे मनपाच्या चौथ्या मजल्यावर आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Jalgaon News : देवदर्शनाहून परतताना अपघात, क्रूझरमधील नाशिकच्या २ महिलांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Solapur Banana: केळी उत्पादक शेतकऱ्यांचे ८०० कोटींचे नुकसान; पंढरपूर तालुक्यातील सुमारे ९०० एकरावरील केळीच्या बागा भुईसपाट

SCROLL FOR NEXT