पुणे

दूरदर्शन ते ओटीटी माध्यमांचा वेगवान बदल

CD

पुणे, ता. १५ : तंत्रज्ञानाच्या युगात आज दृकश्राव्य माध्यमांच्या स्वरूपातही बदल झाले आहेत. दूरदर्शन ते स्मार्टफोन आणि आता ओटीटी असा हा बदल अत्यंत वेगाने होत आहे. या बदलत्या स्वरूपाच्या माध्यमातून खरेदी, मनोरंजन, शिक्षण अशा सर्व गोष्टी होत असल्या तरी माणूस मात्र बदलणार नाही. विविध पर्याय शोधत माध्यमांपेक्षा माणूस पुढे राहिल, असे मत निर्माते श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्‍त केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘दृकश्राव्य माध्यमांचे भवितव्य’ या विषयावर गोडबोले बोलत होते. गोडबोले म्हणाले, ‘‘मनोरंजनासाठी वापरत असलेल्या ‘टिव्ही’ची जागा आता स्मार्टफोनने घेतली आहे. याद्वारे संवादच नाही, तर शिक्षण, मनोरंजन, खेळ त्याचबरोबर कामे ही केली जातात. त्यामुळे स्मार्टफोन प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाची बाब झाला आहे. याचा वापर इतका वाढला, की अनेक लोक आपला सर्वाधिक वेळ यात घालवतात. दृकश्राव्य माध्यमे जेव्हा सुरू झाली तेव्हा ते श्राव्य स्वरूपात होते. काळानुसार यात बदल होत ते दृकश्राव्य माध्यम झाले. त्यात पहिले दृकश्राव्य माध्यम हे दूरदर्शन. सॅटेलाईटमुळे दृकश्राव्य माध्यमांमध्ये क्रांती झाली. त्यात जाहिरातींमुळे व्यवसाय निर्माण झाला. काळानुसार माध्यमांमध्ये बदल झाले. पूर्वी चित्रपट गृहात प्रेक्षकांची चित्रपट पाहण्यासाठी गर्दी असायची. परंतु आता तशी स्थिती नाही. वर्ल्ड टिव्ही प्रिमियर पद्धतीमुळे चित्रपट टीव्हीवर आल्यावर पाहण्याची मानसिकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यात ओटीटीची भर पडल्यामुळे आज ओटीटीसाठी मालिका, चित्रपट आदी मनोरंजनाच्या बाबी तयार करण्यात येतात. परिणामी लोकांची मनोरंजनाची आवड बदलत आहे.’’ स्वप्नील पोरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT