पुणे

यंदा ‘दगडूशेठ’ विसर्जन मिरवणुकीत पहिल्याच दिवशी सहभागी होणार ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

CD

पुणे, ता. २३ : ‘‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पहिल्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहभागी होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत दुसऱ्या दिवशी सहभागी होण्याची दगडूशेठ गणपतीची परंपरा यंदापासून खंडित होणार आहे,’’ अशी माहिती दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली.

या ट्रस्टच्या वतीने पुणे शहरातील विविध गणेश मंडळांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी बुधवारी (ता.२३) पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे निघते. यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होत नाही. त्यामुळे यंदापासून विसर्जन मिरवणुकीत हा बदल केला आहे. लक्ष्मी रस्त्यावरून ही मिरवणूक निघते. परंतु, गणपती निघण्यास होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागील वर्षी दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता दगडूशेठ गणपतीचे बेलबाग चौकात आगमन झाले होते. यामुळे भाविकांना दर्शनासाठी खूप ताटकळत राहावे लागले होते. हे टाळण्यासाठी आणि भाविकांच्या भावनांचा विचार करून यंदापासून हा बदल केला आहे.’’
अनेक गणेश मंडळे दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी फारशी उत्सुक नसतात. अशावेळी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT