पुणे

सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कारवाई

CD

पुणे, ता. ३१ : शहरात दहशत माजविणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. उमेश वसंत जंगम (वय २५ रा. नारायण पेठ) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
उमेश जंगम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विश्रामबाग, दत्तवाडी आणि फरासखाना पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, घरफोडी, दुखापत करणे असे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे नुकसान होईल, या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपी उमेश जंगम याची एमपीडीए कायद्यांतर्गत कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी केली आहे.
फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, पीसीबी विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी ही कारवाई केली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एमपीडीए कायद्यांतर्गत केलेली ही पहिलीच कारवाई आहे. यापुढेही सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मी मुंबईत नसणार, पण... वाढदिवसाआधी राज ठाकरेंचं मोठं आवाहन; कार्यकर्त्यांना दिला खास संदेश, पोस्टमध्ये काय लिहिलं?

'अल्फा' चित्रपटात आलियासोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; बॉबी देओलसोबत करणार ऍक्शन सीन, तुम्ही ओळखलं का?

Pune Metro Issue : मेट्रो स्थानके यार्डातच! हिंजवडी-बाणेर मार्गावरील स्थानकांची कामे अपूर्ण

Latest Marathi News Live Update : सांगली-तासगाव रस्त्याचे काम संत गतीने, नागरिकांना त्रास

Nanded Crime: प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल घरातून गेली, ती आलीच नाही; नेमकं काय घडलं? सासूने सगळं सांगितलं...

SCROLL FOR NEXT