पुणे

महारेरा प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटवर होऊ शकते कारवाई

CD

पुणे, ता. ४ : रिअल इस्टेट एजंटच्या कार्यपद्धतींमध्ये सुसंगतता आणण्यासाठी, त्यांच्यातील ज्ञान आणि जागरूकता वाढविण्यासाठी, घर खरेदीदारांना साहाय्य करण्यासाठी आणि एजंटनी व्यावसायिकदृष्ट्या पात्र असावे म्हणून महारेराने रिअल इस्टेट एजंटसाठी ‘रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र’ अभ्यासक्रम सुरू केला आहे. (महारेरा आदेश क्र. ४१/२०२३) २० सप्टेंबर रोजी महारेराने यासंदर्भात नवीन आदेश काढले असून (महारेरा आदेश क्र. ४१A/२०२३) यात प्रथमच महारेराने सक्षमता प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटवर योग्य ती कारवाई करू असा इशारा दिला आहे. १ नोव्हेंबरनंतर फक्त तेच रिअल इस्टेट एजंट ज्यांच्याकडे महारेरा रिअल इस्टेट एजंट सक्षमता प्रमाणपत्र आहे हेच महारेरा रिअल इस्टेट एजंट नोंदणी अथवा नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात. तसेच विद्यमान नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंटना एक जानेवारी २०२४ पूर्वी महारेरा रिअल इस्टेट एजंटचे सक्षमतेचे प्रमाणपत्र प्राप्त करणे आणि ते त्यांच्या संबंधित वेब पृष्ठावर अपलोड करणे अनिवार्य आहे. असे न झाल्यास योग्य ती कारवाई सुरू केली जाईल, असे स्पष्ट निर्देश ताज्या आदेशात महारेराने दिले आहेत. याच आदेशात महारेराने प्रवर्तकांनाही निर्देश दिले आहेत की ज्या एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल अशाच एजंटशी त्यांनी संबंध ठेवावेत व त्यांच्यामार्फत व्यवहार करावेत २० तासांचे हे प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण करून महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सोमवारपासून (ता. ९) प्रशिक्षण सुरु होत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यास परीक्षेसाठी अर्ज करता येतो. हे अर्ज करण्याचे पोर्टल लवकरच सुरु होणार असल्याने तत्पूर्वी प्रशिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
प्रवेशासंदर्भात व अधिक माहितीसाठी संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०३

लोगो-----PNE23T72635

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Audul voter verification drive : आडूळ केंद्रात मतदार पडताळणीला वेग : १०,८०९ पैकी ३,०५४ फॉर्म ऑनलाइन, २९ जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरण्याचे आवाहन

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात इंधनटंचाई चालणार नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; पेट्रोल-डिझेल, गॅसपुरवठ्याचा ठोस आराखडा सादर करा

SCROLL FOR NEXT