पुणे

अनधिकृत बांधकामप्रकरणी संजय काकडे यांना नोटीस

CD

पुणे, ता. १३ ः कर्वेनगरमधील काकडे पॅलेस व मंगल कार्यालयातील अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेच्या बांधकाम विभागाने उद्योजक संजय काकडे यांना नोटीस बजावली आहे. हे बांधकाम त्वरित काढावे, अन्यथा महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे. महापालिकेकडे आलेल्या तक्रारीनुसार पाहणी केल्यानंतर मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर २५१ व तिसऱ्या मजल्यावर विनापरवाना ४२० चौरस मीटर बांधकाम केल्याचे व त्याचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर बांधकाम विभागाने काकडे यांना नोटीस बजावली. ३० दिवसांत अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे व मिळकत पूर्ववत करावी. अन्यथा महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल, असेही नोटिसीत नमूद केले आहे.

काकडे पॅलेस व मंगल कार्यालयातील बांधकाम अनधिकृत नाही. २००३ मध्ये त्यास मंजुरी मिळाली आहे. बांधकाम विभागाकडे दुरुस्त नकाशे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. महापालिकेस यापूर्वीही आम्ही पत्र दिले आहे, आताही देणार आहोत.
- संजय काकडे, बांधकाम व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

Latest Marathi News Live Update : अर्णब बॅनर्जी यांची राज्य तृणमूल युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

IND vs AFG: Rohit Sharma ने इतिहास घडवला! ३७ वर्षे जूना विक्रमही मोडला अन् 'असा' पराक्रम करणारा पहिला भारतीय ओपनर ठरला

काव्या मारनचा मोठा डाव! सनराइजर्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा; टेस्ट टीममधून डच्चू मिळालेल्या स्टार खेळाडूकडे दिली टीमची धुरा

Fake Fertilizer Scam : खत म्हणून विकत होते चक्क मीठ! सोलापुरात १० लाखांच्या भेसळयुक्त खतांचा साठा जप्त; कृषी विभागाचा मोठा छापा

SCROLL FOR NEXT