पुणे

सैन्यदलातील नोकरी पडली दोन कोटींना ४२ तरुणांना आमिष दाखवून फसवणूक ; सदर्न कमांडच्या लायझन युनिटकडून पर्दाफाश

CD

पुणे, ता. १३ : सैन्यदलात भरतीचे आमिष दाखवून तरुणांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर्न कमांडच्या लायझन युनिटने या घटनेचा पर्दाफाश केला. सदर्न कमांडच्या लायझन युनिट आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत आरोपीला गुरुवारी (ता. १२) तासगाव येथून अटक केली.

या प्रकरणी महेश पंढरीनाथ ढाके (वय ३५, रा. मारुळ, पाटण, जि. सातारा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पांडुरंग कराळे (वय ४५, रा. पाटील मळा, तासगाव, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधी हा प्रकार घडला. कोंढव्यातील एका हॉटेलमध्ये त्यांची आरोपी कराळेशी ओळख झाली. कराळेने सैन्यदलात वरिष्ठ अधिकारी माझ्या ओळखीचे असून, भरतीसाठी कोणी मित्र, नातेवाईक असतील तर सांगा, असे ढाके यांना सांगितले.
ढाके यांनी ही बाब त्यांच्या मित्रांना सांगितली. त्यानंतर ढाके यांनी त्यांच्या मित्राच्या मुलाबाबत कराळेला विचारणा केली. त्यावर त्याने एका उमेदवाराच्या भरतीसाठी सहा लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानंतर ढाके यांच्या मित्राच्या मुलाने त्याच्या इतर मित्रांना हा प्रकार सांगितला. अशा प्रकारे ढाके यांनी ४२ तरुणांना भरतीसाठी पैसे देण्यास तयार केले. ढाके यांनी इच्छुक उमेदवारांकडून एक कोटी ८० लाख रुपये घेऊन कराळेला दिले.

परीक्षेची तारीख कळवा, अन्यथा पैसे परत द्या
ढाके यांनी कराळेच्या म्हणण्यानुसार तरुणांना बेळगाव येथे नेले. कराळे याने त्यांच्याकडून भरतीसाठी लागणारी कागदपत्रे मागवली. कराळे आणि त्याच्या साथीदारांनी त्या तरुणांची वैद्यकीय तपासणी केली. त्याने या तरुणांना परीक्षेचे बनावट प्रवेशपत्र ढाकेंना पाठवली. त्यानंतर कराळे हा ‘भरती प्रक्रिया लवकरच सुरू होइल, काळजी करून नका’ असे सांगत परीक्षेची तारीख पुढे ढकलत होता. त्यावर ढाके यांनी परीक्षेची तारीख कळवा अन्यथा पैसे परत करा, असे बजावले. परंतु, कराळे हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यावरून ढाके यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत सदर्न कमांडच्या लायझन युनिटला माहिती मिळाली. या पथकातील जवानांनी कराळेचा शोध घेऊन त्याला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. कराळेने तरुणांकडून लाखो रुपये आणि मूळ कागदपत्रे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT