पुणे

ललितकडून आणखी तीन कोटींचे सोने जप्त

CD

पुणे, ता. ३ : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याने नाशिकमधील एका सराफा व्यापाऱ्याकडे ठेवलेले सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे पाच किलो सोने पोलिसांनी जप्त केले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमध्ये ही कारवाई केली.
ललित सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. ललितने नाशिकमधील एका सराफा व्यापाऱ्याकडे सोने ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्यासह एक पथक गुरुवारी (ता. २) नाशिकला रवाना झाले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने त्या सराफाकडून पाच किलो सोने जप्त केले आहे. यापूर्वी पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण पाटीलच्या घरातून एक कोटी ८० लाख रुपये किमतीचे तीन किलो सोने जप्त केले होते. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ललितने अमली पदार्थ मेफेड्रॉनच्या तस्करीतून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आणि सोने खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. ललितकडून चौकशीत आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sriram Krishnan: ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का! भारतीय वंशाच्या एआय तज्ञांनी घेतला व्हाईट हाऊस सोडण्याचा निर्णय, कोण आहेत श्रीराम कृष्णन?

रिवा-हैद्राबाद रेल्वे आता बल्लारशामार्गे धावणार; विदर्भातून तेलंगणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा...

IND vs AFG,Test: भारताच्या साडेपाचशे धावा, तरीही अफगाण गोलंदाजाचा डंका; जुरेलला बाद करून काढला वचपा; VIDEO

Latest Marathi News Live Update : देशासह राज्यात 'नो टॉलरन्स फॉर ड्रुग्ज' मोहीम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT