Pune Water Supply Sakal
पुणे

Pune Water Supply : पुण्यातील पाणी कपातीचा ऑगस्ट महिन्यात आढावा

खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने पाणी साठ्यात वाढ होऊन ६० टक्के पाणी जमा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने पाणी साठ्यात वाढ होऊन ६० टक्के पाणी जमा झाले आहे. मात्र, पुणे शहरात लागू असलेली कपात अद्याप मागे घेतली जाणार नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वसरगाव, टेमघर या चार धरणांत सोमवारी सायंकाळपर्यंत १७. २१ टीएमसी म्हणजे ६० टक्के पाणी जमा झाले आहे. मात्र, गेल्यावर्षी याच दिवशी २०.४८ टीएमसी (७० टक्के) पाणी होते.

गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे पावणे तीन टीएमसी धरणात कमी आहे. उन्हाळ्यात धरणातील पाणी कमी झाल्याने व सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविल्याने महापालिकेने दर गुरुवारी शहरातील पाणी बंद करून कपातीचा निर्णय घेतला.

त्यामुळे अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. टँकरसाठी सोसायट्यांना दर महिन्याला हजारो रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे पाणी कपात मागे घेण्याची प्रतिक्षा आहे.


दरम्यान, गेल्या आठवड्यापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पण धरणात अजूनही ४० टक्के कमी आहे. १०० टक्के धरण भरण्यासाठी आणखी जोरदार पावसाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे महापालिकेनेही आणखी काही काळ वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे.

खडकवासला धरण प्रकल्पात सध्या ६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अजून ४० टक्के धरणे भरणे आवश्‍यक आहे. अशाच प्रकारे पाऊस पडत राहिल्यास लवकरच धरणे भरतील. पुणे शहरातील पाणी कपात मागे घेण्याबाबत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेऊन निर्णय घेऊ.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT