पुणे

एक्स्पो

CD

आता निवडा भटकंतीचे पर्याय
शुक्रवारपासून सकाळ टुरिझम एक्स्पो

पुणे, ता. ३१ : पर्यटकांचा आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी ‘सकाळ माध्यम समुहाने’ ने ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’चे आयोजन केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे अनेक पर्याय व सवलतीच्या दरात टूर पॅकेज देणाऱ्या अनेक टूर कंपन्या यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या एक्स्पोत पर्यटकांना त्यांच्या पर्यटनाचे स्वप्न साकार करता येणार आहे.
एक्स्पोमध्ये जगभरातील भ्रमंतीसाठी माहिती मिळेल. सात खंडांतील हजारो टूर्स, देशविदेशातील सहली, आंतरराष्ट्रीय पर्यटन, लाँग विकेंड टुर्स आदींचे पर्याय मिळतील. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत सहलीचे नियोजन करणाऱ्यांना एक्स्पो पर्वणीच ठरेल. पर्यटनाविषयी हवी ती सर्व माहिती टूर कंपन्यांकडून मिळेल.
भारतातील वारसास्थळे, निसर्गसौंदर्य लाभलेली ठिकाणे, जंगल सफारी, आरोग्यदायी सहल, धार्मिक पर्यटन, जगभरातील भन्नाट समुद्रकिनारे, वास्तूकलेचा अनुभव देणारी स्थळे, अप्रतिम वास्तुरचना असलेली स्थळे आणि मुलांची पसंती असलेले मनोरंजनाचे पार्क आदींचा अनुभव घेण्यासाठी एक्स्पोच्या माध्यमातून नियोजन करता येईल.
या एक्स्पोचे ‘गिरिकंद ट्रॅव्हल्स’ शीर्षक प्रायोजक, ‘केसरी टुर्स’ आणि ‘कॅप्टन नीलेश हॉलिडेज’ प्रायोजक तसेच ‘जॉय ॲण्ड क्रू व्हेकेशन’ सहयोगी प्रायोजक आहेत.

‘सकाळ टुरिझम एक्स्पो’
कधी ः चार ते सहा ऑगस्ट
कुठे ः सोनल हॉल, कर्वे रस्ता
वेळ ः सकाळी ११ ते रात्री आठ
पार्किंग व प्रवेश ः निःशुल्क
---
कोरोनामुळे अनेकांना मनसोक्त पर्यटन करता आले नव्हते, मात्र आता पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडून भ्रमंती करीत आहेत. पावसाळ्यानंतर सुमारे सहा महिने पर्यटन सुरू असते. या एक्स्पोच्या माध्यमातून आम्ही अनेक नवीन टूर घेऊन येत आहोत. आकर्षक दरात टूर पॅकेजेस असतील. त्यामुळे एक्स्पोत पर्यटकांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जाण्याचे पॅकेज निवडता येर्इल.
- अखिलेश जोशी, संचालक, गिरिकंद ट्रॅव्हल्स
-----

लोगो युनिट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय! आई-बहिणीची शिवी दिली तर दंड आकारणार; नवा नियम लागू, दंड किती लागणार?

Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

स्ट्रेट ऑफ होर्मुज संकट; भारताला LPG कसा मिळणार? तज्ज्ञांनी सांगितले पर्याय

Latest Marathi News Live Update : व्यवसायिक सिलेंडर बंदीमुळे हॉटेल व्यवसाय संकटात; हजारो कामगारांवर बेरोजगारीचं सावट

SCROLL FOR NEXT