पुणे

गौरी गणपती साहित्य जत्रा आजपासून

CD

पुणे, ता. ९ ः प्रियदर्शनी वुमन्स फोरम आणि बिटिया फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गौरी-गणपती साहित्य जत्रेचे आयोजन केले आहे. या साहित्य जत्रेत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वाती ते मूर्तीपर्यंतच्या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. यंदा जत्रा रविवारपासून (ता. १०) ते १७ सप्टेंबरपर्यंत भरणार आहे.
ही जत्रा काँग्रेस भवनच्या पटांगणामध्ये भरविण्यात येणार आहे. उद्‌घाटन रविवारी दुपारी साडेचार वाजता महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेत्री स्मिता गोंदकर, आरती शिंदे, काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित राहणार असल्याचे प्रियदर्शनी वुमन्स फोरम आणि बिटिया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी सांगितले.
तिवारी म्हणाल्या, ‘‘एकाच ठिकाणी गौरी-गणपतीचे सर्व साहित्य मिळावे ही मुख्य संकल्पना आहे. रोज सायंकाळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना आणि मी सावित्री बोलतेय या कार्यक्रमांनी होणार आहे. त्यानंतर आठवडाभर मंगळागौर कार्यक्रम, फॅशन शो, नऊवारी फॅशन शो, लहान मुलांचा टॅलेंट शो, ऑर्केस्ट्रा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हे सर्व कार्यक्रम मोफत असणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT