पुणे

फुरसुंगी, उरुळी देवाच्या हरकतींवरील सुनावणी पूर्ण

CD

पुणे, ता. १४ : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या अधिसूचनेवर दाखल हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. लवकरच या सुनावण्यांचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे २०१७ मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर येथे महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने आणि कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा दावा करत या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे वगळण्याचे जाहीर केले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रक्रिया सुरू करून शासनाकडे अहवाल पाठविला होता. दरम्यान, प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून हवेली प्रांत यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडून प्राप्त हरकती, सूचनांवरील सुनावणी पूर्ण झली आहे. सध्या पालख्या पुणे जिल्ह्यात असल्याने जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी या कामात गुंतले आहेत. त्यामुळे पालख्या सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ झाल्यानंतर याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT