पुणे

‘एलजीबीटीक्यू संमेलना’चे रविवारी आयोजन

CD

पुणे, ता. ६ : ‘बिंदू क्लिअर राईट्स फाउंडेशन’ आणि ‘युतक चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे महाराष्ट्रातील एकमेव ‘एलजीबीटीक्यू साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या संमेलनाचे तिसरे वर्ष आहे, अशी माहिती बिंदू क्लिअर राईट्स फाउंडेशनचे संस्थापक बिंदुमाधव खिरे यांनी दिली.
पौड फाटा येथील द बॉक्स येथे रविवारी (ता. ८) सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे संमेलन होणार आहे. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे (निवृत्त), ‘मिळून साऱ्याजणी’ आणि ‘पुरुष उवाच’च्या संपादक डॉ. गीताली वि. मं., बडोदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख, भारतातील पहिले एलजीबीटीक्यू कार्यकर्ते अशोक कवी उपस्थित असणार आहेत.
या संमेलनामध्ये चर्चा सत्र, मुलाखत, अनुभव कथन, कविता वाचन, पुस्तक परिचय, कथा वाचन, पालक कट्टा या उपक्रमांचा सहभाग आहे. याविषयी बोलताना युतक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अनिल उकरंडे म्हणाले, ‘‘पुणे शहराने नेहमीच, वंचित दुर्लक्षित चळवळींना दिशा देण्याचं काम नेहमीच केले आहे. एलजीबीटीक्यू चळवळ केवळ जून महिन्यातील प्राइड वॉक पुरती मर्यादित नाही. आमच्या समाजाच्या समस्या आणि साहित्य यांना मुख्य प्रवाहातील साहित्य संमेलनाने दुर्लक्षित केले. त्यामुळे आम्ही डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन एलजीबीटीक्यू समाजाचे साहित्य संमेलन आयोजित केले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

Jayakwadi dam drowning incident: जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT