DSK  Sakal
पुणे

DSK : ईडीने जप्त केलेल्या बंगल्यात जाण्यास डिएसकेंना परवानगी

ईडीने पुरेशा कर्मचाऱ्यांसह डीएसके यांचे निवासस्थान आणि कार्यालय उघडावे. डीएसके आणि कुटुंबीयांना त्यात प्रवेश देवून त्यांनी त्यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात आणि कार्यालयात जाण्यास दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंगला आणि कार्यालयात असलेली कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी अर्ज केला होता.

डीएसके यांचा सेनापती बापट रस्त्यावर सप्तशृंगी नावाचा बंगला आहे. तर डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे जंगली महाराज रस्त्यावर कार्यालय आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने या दोन्ही मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी माझी अनेक कागदपत्रे आहेत. त्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेदेखील आहेत.

ज्यांचा उपयोग माझ्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये माझी बाजू मांडण्यासाठी होवू शकतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जाऊन कागदपत्रे आणि उपकरणे ताब्यात घेण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज डीएसके यांनी या प्रकरणातील विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात केला होता. त्यानुसार न्यायालयाने ही परवानगी दिली आहे.

कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करावे

ईडीने पुरेशा कर्मचाऱ्यांसह डीएसके यांचे निवासस्थान आणि कार्यालय उघडावे. डीएसके आणि कुटुंबीयांना त्यात प्रवेश देवून त्यांनी त्यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत. या सर्व प्रक्रियेचा पंचनामा करून कागदपत्रांच्या योग्य वर्णनासह यादी नोंदवून ठेवावी. ईडी आणि डीएसके यांनी या आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा. ईडी आणि डीएसके असे दोघेही प्रवेश आणि कागदपत्रे घेतानाचे व्हिडिओ शूटिंग घेवू शकता. कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT