पुणे

ससून रुग्णालयात आमदार कांबळे यांची केली मारहाण

CD

भाजप आमदाराकडून दोघांना मारहाण
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह पोलिसावर हात उचलला
पुणे, ता. ५ : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी दोन जणांना मारहाण केली. त्यापैकी एक जण पोलिस आहे. दुसऱ्या व्यक्तीचे नाव जितेंद्र सातव असे असून ते राष्ट्रवादी वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख आहेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत हे प्रकार घडले.
ससून रुग्णालयातील नव्या इमारतीचे उद््घाटन आणि विविध सेवांचे लोकार्पण असा कार्यक्रम होता. कोनशिलेवर कांबळे यांचे नाव नव्हते. ते पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच ते स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करीत होते. तेव्हा व्यासपीठावर अजित पवार उपस्थित असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्याचवेळी कांबळे यांनी सातव यांना फटका मारल्याचे सांगण्यात आले.
दुसरा प्रकार बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील महात्मा गांधी सभागृहात घडला. कार्यक्रम संपल्यानंतर कांबळे व्यासपीठावरून खाली उतरत होते. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसाच्या गालावर त्यांना मारले. ही घटना दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली.
दरम्यान, सभागृहातून बाहेर पडताच कांबळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशीही वाद घातला. ससून रुग्णालय ज्या भागात आहे तेथील स्थानिक आमदार असूनही माझे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या बाबत हक्कभंगही दाखल करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. त्या वेळी डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या पत्रव्यवहाराची प्रती मोबाईलवर दाखविल्या. त्यामुळे नावाबाबतची चूक आपल्या कार्यालयातून झाली नसल्याचे त्यांनी त्याच वेळी स्पष्ट केले. मात्र, मागासवर्गीय आमदारावर अन्याय होत असल्याचे सांगत कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली.
---
‘मारहाणीचा उद्देश नव्हता’
या पार्श्वभूमीवर संपर्क साधला असता कांबळे म्हणाले, “मी व्यासपीठावरून खाली उतरत असताना संबंधित पोलिस कर्मचारी माझ्या अंगावर पडले. त्यातून तोल सावरत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, अन्यथा मीच खाली पडलो असतो. कोणालाही कोणत्याही स्वरूपाची मारहाण करण्याचा उद्देश नव्हता.”
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

SCROLL FOR NEXT