SSC HSC Exam Sakal Digital
पुणे

HSC SSC Exam: दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करताय? 7 Tips लक्षात ठेवा

Exam Preparation Tips: बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातील ३० लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात

मीनाक्षी गुरव

Exam Preparation Tips

पुणे : तुम्ही दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहात का? किंवा तुमच्या घरात कोणी बोर्डाच्या परीक्षेची तयार करत आहे का?, तर मग इकडे लक्ष द्या. बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असताना शेवटच्या टप्प्यात परीक्षेची तयारी करताना लिखाणावर आणि प्रश्नपत्रिकानिहाय अभ्यास करण्यावर भर द्यावा. अभ्यासक्रमातील सर्वांत अवघड वाटणारा भाग समजून घेऊन तो अभ्यास करण्यावर अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला शिक्षक, तज्ज्ञ समुपदेशक देत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी-बारावीची लेखी परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातील ३० लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यामुळे सध्या राज्यातील तीस लाखांहून अधिक विद्यार्थी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहेत.

विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव सर्वाधिक करावा. अनेकदा विद्यार्थी अभ्यासाचा सराव करताना प्रश्नांची उत्तरे तोंडी पाठ करतात. परंतु तीच उत्तरे लिहिताना परीक्षेच्या वेळेच्या वेगाने लिखाण करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव करावा. तसेच, अभ्यासक्रमातील जे आपल्याला येत आहे, तोचतोच अभ्यास पुन्हा-पुन्हा केला जातो. त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी जो अभ्यास आपल्याला येत नाही, किंवा अवघड वाटतो, त्याचा सराव अधिक केला पाहिजे.
- केदार टाकळकर, समुपदेशक

बोर्डाच्या परीक्षेसाठी वर्षभर तयारी केली आहे. त्यामुळे परीक्षा जवळ आली म्हणून ताण घेऊ नका, किंवा भीतीही बाळगू नका. भीती मनात न ठेवता परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज रहा. वर्षभर अभ्यास केला असला तरी शेवटच्या टप्प्यात अभ्यासाची केलेली उजळणी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे उजळणी आणि सराव करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्या. तसेच, पालकांनी परीक्षेच्या काळात घरातील वातावरण आरोग्यपूर्ण ठेवावे.
- डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

अभ्यासाची सात सूत्रे
१. मन एकाग्र ठेवा
२. वर्षभर केलेल्या अभ्यासाचा सराव करा
३. परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने सरावासाठी ‘मॉक टेस्ट’ द्या
४. परीक्षेच्या सरावासाठीही नोट्‌स काढा
५. अभ्यासक्रमातील अवघड वाटणाऱ्या संकल्पना पुन्हा-पुन्हा समजून घ्या
६. एखादी संकल्पना अद्याप स्पष्टपणे न समजल्यास ती शिक्षक, मार्गदर्शक, घरातील मोठी मंडळी किंवा मित्र-मैत्रिणींकडून समजून घ्या
७. धड्यानुसार अभ्यास करण्यापेक्षा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास करा

पालकांसाठी सूचना
- घरातील वातावरण आनंददायी आणि आरोग्यपूर्ण ठेवा
- मुलांना परीक्षेपूर्वी काही दिवस आणि परीक्षेच्या काळात संतुलित आहार द्या
- परीक्षा सुरू होण्यापूर्वीच केंद्र पाहून या
- मुलांवर अभ्यासाचा, परीक्षेचा, गुणांचा ताण टाकू नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT