Leopard News  sakal
पुणे

Leopard News : बिबट्या निसटला तरी ‘सीझेडए’ अनभिज्ञ

प्राणिसंग्रहालयाच्या पिंजऱ्यातून वन्यप्राणी बाहेर पडल्याची देशातील दुर्मीळ घटना पुण्यात घडली. मात्र त्याबाबत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए) अनभिज्ञ असल्याची माहिती बुधवारी पुढे आली.

CD

पुणे : प्राणिसंग्रहालयाच्या पिंजऱ्यातून वन्यप्राणी बाहेर पडल्याची देशातील दुर्मीळ घटना पुण्यात घडली. मात्र त्याबाबत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए) अनभिज्ञ असल्याची माहिती बुधवारी पुढे आली. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे पुण्यातील वन्यजीव वॉर्डनतर्फे या घटनेचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील विलगीकरण कक्षाच्या पिंजऱ्यातून सोमवारी पहाटे सचिन नावाचा साडेसात वर्षांचा बिबट्या निसटला. तेथे सीसीटीव्ही नव्हते. पिंजऱ्याच्या वरच्या भागातील गज निसटला होता. त्यामुळे त्याच्या शेजारचा गज बाजूला सरकवून बिबट्या पळाला, असे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची कोणतीही अधिकृत माहिती केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारावर अहवाल मागविण्यात आला असल्याची माहिती पुढे आली.

याबाबत केंद्रीय प्राणिसंग्रहालयाचे सदस्य सचिव संजय शुक्ला यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला. ते म्हणाले, ‘‘पुण्यातील प्राणिसंग्रहालयातून बिबट्या बाहेर पडला. तो ४० तास पिंजऱ्याच्या बाहेर होता. या घटनेची अधिकृत माहिती केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला तातडीने कळविणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती प्राणिसंग्रहालयाने दिलेली नाही. त्याची आता स्वतःहून दखल घेतली आहे. प्राधिकरण वन्यजीव वॉर्डनला या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्या आधारावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.’’

महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव प्रभुनाथ शुक्ला म्हणाले, ‘‘पुण्यातील प्राणिसंग्रहालयात घडलेल्या घटनेची माहिती प्राधिकरणाला मिळाली आहे. त्यात घटना काय घडली, कशी घडली याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. मात्र, भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी सखोल चौकशी करण्यात येईल. त्यासाठी वन्यप्राणी जीवतज्ज्ञांचे स्वतंत्र पथक तयार करून ते घटनास्थळाची पाहणी करेल. यात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील निर्देश देण्यात येतील’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT