pune cyber crime Sakal
पुणे

Pune Crime News : आर्थिक फसवणुकीचे सायबर चोरट्यांना ‘क्रेडिट’

धनकवडीतील गौतम (वय ३५) एका खासगी कंपनीत कामास आहेत. त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ‘सध्या तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत नाही. कार्ड ब्लॉक करावे लागेल. अन्यथा दंड भरा,’ असे सांगितले.

अनिल सावळे -@AnilSawale

Pune News : धनकवडीतील गौतम (वय ३५) एका खासगी कंपनीत कामास आहेत. त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ‘सध्या तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत नाही. कार्ड ब्लॉक करावे लागेल. अन्यथा दंड भरा,’ असे सांगितले.

गौतम यांना बॅंकेतील एखाद्या कर्मचाऱ्याचा फोन असावा, असे वाटले. समोरील व्यक्तीने त्यांना मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज पाठवून एपीके ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार गौतम यांनी मेसेजवर क्लिक करून ॲप डाऊनलोड केले.

त्यानंतर त्या व्यक्तीने मोबाईल स्क्रीन शेअर करून गौतम यांच्या बॅंक खात्यातून तब्बल २८ लाख रुपये ऑनलाइन काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गौतम यांनी १६ मार्चला सायबर पोलिस ठाणे गाठले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

अन्य एका घटनेत वाघोली येथील एका ३९ वर्षीय महिलेची अशीच फसवणूक झाली. अनोळखी व्यक्तीने या महिलेला मोबाईलवर पॉप-अप मेसेज पाठविला. महिलेने त्या मेसेजवर क्लिक करताच त्या व्यक्तीने क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती घेतली.

त्यानंतर मोबाईल स्क्रीन शेअर करून क्रेडिट कार्डवरून अडीच लाख रुपये ऑनलाइन काढून घेतले. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या या दोन प्रातिनिधिक घटना. परंतु शहरात अशा आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

सायबर चोरटे नागरिकांच्या बॅंक खात्यातील रकमेची माहिती घेऊन त्यांना लक्ष्य करीत आहेत. शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडून एरंडवणे येथील एका ३६ वर्षीय महिलेची ८८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

सायबर चोरट्यांनी या महिलेला व्हॉटसॲपवर लिंक पाठवून बॅंक खात्यात पैसे ट्रान्स्फर करून घेतले. शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा देऊ, असे सांगून सायबर चोरट्यांनी औंधमधील जयरामन यांना ३८ लाख रुपयांचा गंडा घातला. तसेच, धानोरीतील सजित यांना टेलिग्राम ॲपद्वारे ऑनलाइन टास्कसाठी चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून १९ लाखांची फसवणूक केली.

प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज
सायबर चोरट्यांकडून शहरात दररोज आर्थिक फसवणूक केली जात आहे. परंतु सायबर पोलिस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ आहे. पोलिस ठाण्यांमध्ये प्रशिक्षित अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विलंब होत आहे. बॅंक खात्यातून एकदा पैसे गेल्यास परत मिळतील याची खात्री राहिलेली नाही. सायबर पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे उत्तर मिळते. घटना घडल्यानंतर नागरिकांनीही तातडीने तक्रार करणे अपेक्षित आहे. अशा अपवादात्मक घटनांमध्ये नागरिकांना पैसे परत मिळण्याची शक्यता असते.

पॉप-अप मेसेज म्हणजे काय?
संगणक किंवा मोबाइलच्या स्क्रीनवर पॉप-अप संदेश पाठवून विशिष्ट घटना किंवा इनपुटबद्दल सूचना दिली जाते. ऑनलाइन जाहिराती, सॉफ्टवेअर किंवा सिस्टिमच्या स्थितीबद्दल माहिती दिली जाते. परंतु सायबर चोरट्यांकडून त्याचा गैरवापर केला जात आहे. मोबाईल स्क्रीन शेअरची लिंक पाठवून फसवणूक केली जात आहे.

आर्थिक फसवणुकीच्या घटना (वर्ष २०२३)
३६१ - ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याचे आमिष

१४९- डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर

६६ - शेअर मार्केट ट्रेडिंग फसवणूक

७८ - केवायसी अपडेटचा बहाणा
१० - ओटीपी शेअर करून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT