medha kulkarni Sakal
पुणे

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील पोलिसांच्या चुकांवर डॉ. मेधा कुलकर्णी यांचे बोट

अल्पवयीन मुलाने भरधाव कारच्या धडकेत दोघांचा बळी घेतला. या प्रकरणी पोलिसांनी ब्लॅक या पबच्या मालकाचे नाव गुन्ह्यातून का वगळले, असा सवालही त्यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कल्याणीनगरमधील अपघाताच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे पोलिसांच्या चुकांवर बोट ठेवले आहे. या संदर्भात त्यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी पोलिस आयुक्तांना एक निवेदनही दिले. अपघात झाल्यावर पोलिस तक्रार घेत नाहीत.

दोषींना दंड करीत नाहीत. उलट तक्रार नोंदवायला गेलेल्यांनाच धारेवर धरतात. रात्री, बेरात्री अल्पवयीन मुले गाड्या भरधाव वेगाने चालवितात. सोसायट्यांमधील अंतर्गत रस्त्यांवर मोटारीत टेपवर मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा सुरु असतो.

पोलीसांना फोन करूनही उपयोग होत नाही. पोलिसांचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनाच जबाबादार धरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

अल्पवयीन मुलाने भरधाव कारच्या धडकेत दोघांचा बळी घेतला. या प्रकरणी पोलिसांनी ब्लॅक या पबच्या मालकाचे नाव गुन्ह्यातून का वगळले, असा सवालही त्यांनी केला.
शहरात अनधिकृत पब, बार, रूफ टॉप हॉटेल्सची बांधकामे अवैध आहेत.

ही हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. कल्याणीनगरमधील अपघात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा घटना पुण्यात वारंवार घडत असताना पोलिस कुचकामी ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात एकूण अधिकृत पब, बार किती, अनधिकृत आणि अनियमित किती याची माहिती मिळावी आणि कारवाईचे वेळापत्रक द्यावे, अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा निर्देश धाब्यावर

रहिवासी भागात बार आणि पब असू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. तरीही रामबाग कॉलनी, बाणेर-बालेवाडी आदी भागात रूफ टॉप हॉटेल्स, बार सुरु झाले आहेत, असे खासदार कुलकर्णी यांनी या निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT