वारजे, ता. २४ : वारजे माळवाडी परिसरात वारंवार कारवाई करूनही अवैध हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवल्याने निकिता रणधीर बिरे (रा. विठ्ठलनगर, वारजे माळवाडी) या महिलेवर पोलिसांनी ‘एमपीडीए’ कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली. तिला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे.
पुणे शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. निकिता बिरे हिच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्याकडून यापूर्वी वेळोवेळी कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. मात्र, तिच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर २२ ऑक्टोबरला संबंधित महिला आरोपीला ताब्यात घेऊन कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुवर्णा हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे, मनोज साळुंखे, पोलिस अंमलदार विजय खिलारी, अमोल सुतकर, महादेव शिंदे, योगेश वाघ, बालाजी काटे, निखिल तांगडे, शरद पोळ, अमित जाधव, अमित शेलार, सागर कुंभार तसेच महिला पोलिस अंमलदार अंकिता मोहोळ व अश्विनी धोत्रे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.