पुणे

गणेशोत्सव काळात फुल बाजारात १२ कोटींची उलाढाल

CD

फूल बाजारात बारा कोटींची उलाढाल
गणेशोत्सवामुळे झेंडूसह सजावटीच्या फुलांना मागणी
मार्केट यार्ड, ता. २७ : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न समितीच्या फूल बाजारात गणेशोत्सव काळात सुमारे १२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक, विक्रेते, गणेश मंडळे यांच्याकडून विविध प्रकारच्या फुलांसह दूर्वा, केळीचे पाने, झेंडूलाही मागणी होती. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने भाव स्थिर होते. आणखी काही दिवस सजावटीच्या फुलांना मागणी कायम असणार आहे.
फूल विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही माहिती दिली. ‘बाजारात चांगल्या प्रतीच्या फुलांना मागणी असून सर्व फुलांची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. झेंडू आणि सजावटीच्या फुलांना दरही चांगला मिळत आहे,‘ असे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव परिसरातून फुलांची आवक होत आहे. बाजारात सजावटीसाठी झेंडू, चमेली, डच गुलाब, जरबेरा, कार्नेशन आदी सजावटीच्या फुलांनाही मागणी वाढली आहे. उत्सवामुळे पूजेच्या आणि सजावटीच्या फुलांना मागणी टिकून असल्याचे सागर भोसले यांनी सांगितले.

कर्नाटकमधूनही आवक

झेंडूच्या फुलांची आवक पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. तसेच कर्नाटकातून काही प्रमाणात आवक होत आहे.
---
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी चांगली आहे. आवक जास्त असतानाही फुलांना काही प्रमाणात चांगले भाव मिळत आहेत. यंदा फुलांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
गणेशोत्सव आणि गौराईमुळे जुई, चमेलीचे दर घाऊक आणि किरकोळ बाजारात जास्त होते.
- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन.
---
प्रती किलोचे भाव
प्रकार - घाऊक - किरकोळ
जास्वंद पाकीट (१० फुले)- ५-१० -- १०-२०
झेंडू - ३०-५० - ५०-८०
शेवंती - ३०-५० - ५०-८०
सेंड व्हाइट शेवंती - ९०-१०० - १३०-१५०
गुलछडी - ५५०-७०० - ७००-८००
गुलाबगड्डी - ३०-६० - ५०-१००
सोनचाफा पाकीट (१० फुले) - २० - ३०
अस्टर - (चार गड्डी) १०-१६ - ३०-४०
सुट्टा अस्टर : ६०-१०० - ८०-१५०
जरबेरा (१० फुले) - ३०-५० - १००-१५०
डच गुलाब (२० गुलाब) - १००-१५० - २००-२५०
---
केळीची चार पाने - ५०
दूर्वा - १०
आंब्याची फांदी - २०
तुळशी गड्डी - १०
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT